Tejashree Pradhan New Project | ‘रेवा’ची भूमिका साकारत तेजश्री येणार भेटीला | Lokmat Filmy

2021-08-24 7

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. ’होणार सुन मी या घरची’, ‘अग्गबाई सासूबाई’ सारख्या मालिकांमधून ती घराघरात पोहचली. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपले अभिनय कौशल्य प्रेक्षकांना दाखवल्यानंतर आता तेजश्रीने चित्रपटसृष्टीत आणखी एक पाउल पुढे टाकलं आहे. लवकरच ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी ती तेजश्रीने ‘टेक ड्रीम्स प्रोडक्शन्स’ हे प्रोडक्शन हाऊस सुरू केल्याचे सोशल मिडियाद्वारे सांगितले होते. त्यानंतर ती या प्रोडक्शन हाऊसच्या नव्या प्रोजेक्ट मधून रेवाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचीही चर्चा होती. आता ही चर्चा खरी ठरली आहे. तेजश्रीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ती ‘टेक ड्रीम्स प्रोडक्शन्स’ च्या नव्या प्रोजेक्टमध्ये ती रेवाची भूमिका साकरणार असल्याचे एक फोटो पोस्ट करत सांगितले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलेयं की, “ प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काही शिकवून जाते यावर माझा विश्वास आहे. आज रेवा या भूमिकेने मला अशा गोष्टीतून आनंदाची ओळख करून दिली ज्याला मी नेहमीच घाबरत होते.” असे तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
Snehal vo
#TejashreePradhan #Shubrha #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires